वाघोली (पुणे) – हवेली तालुक्यातील बिवरी गावचे शेतकरी असलेले जवळकर कुटुंब आहे. सैनिक असलेल्या जवानाचा 30 वर्षीय भाऊ गणेश जवळकर उपचारार्थ पुण्यात हॉस्पिटलमध्ये 1 महिन्यापासून दाखल आहे. त्यासाठी मोठा खर्च येणार होता. कुटुंबाने प्रसंगी जमीन विकून उपचार करण्याचे ठरवले होते.
रुग्णाला पुण्यातील नामवंत हॉस्पिटलमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी मोफत उपचार मिळवून दिले. त्यांचे अंदाजे 13 लाखांपेक्षा जास्त रक्कम माफ झाल्याने त्यांना आधार मिळाला आहे. त्यांच्यावर आणखी काही दिवस उपचार सुरू राहणार आहेत. या मदतीबद्दल रुग्णाच्या कुटुंबीयांनी विकास लवांडे यांचा त्यांच्या घरी येऊन सत्कार करून आभार मानले आभार मानले.