वाघोली (पुणे) – बकोरी (ता. हवेली) येथील डोंगर माथ्यावर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी यांच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे, शरद आव्हाळे, प्रदीप सातव, विजय जाचक, माहिती समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत वारघडे, संजय हरगुडे, गणेश जाधव, चैतन्य पवार, मेजर डफळ, धनराज वारघडे उपस्थित होते.