नांदेड : जिल्ह्यातील देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान शुक्रवारी निधन झाले. रात्री उशिरा रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती जाहीर केली.
2009 आणि 2019 या दोन निवडणुकांत त्यांनी या मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून विजय मिळवला होता..
व्यवसायाने अभियंता असलेले अंतापूरकर हे 2009 पासून काँग्रेस पक्षाशी जोडले गेले होते.
त्यांच्या निधनाने पक्षाने एक शांत, संयमी नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
गेले काही दिवस ते मुंबई येथील एका खासगी उपचार घेत होते. दरम्यान, नांदेड विधान परिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.