लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या पंतप्रधानांनाच दंड

ओस्लो – लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चक्क पंतप्रधानांनाच दंड ठोठावण्यात आल्याची घटना नॉर्वेमध्ये घडली आहे. नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी फेब्रुवारी महिन्यात आपला वाढदिवस साजरा केला. त्यावेळी एका छोटेखानी पार्टीमध्ये 13 जण उपस्थित होते. मात्र, नियमांनुसार 10 जणांना परवानगी देण्यात आली होती. सोलबर्ग यांना 20 हजार नॉर्वे क्राउन्स म्हणजे जवळपास एक लाख 75 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. पोलिसांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी एका माउंटन रिसॉर्टवर पार्टी आयोजित केली होती. त्यावरून त्यांच्यावर देशभरातून टीका झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली. साधारणपणे अशा प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई केली जात नाही. मात्र, पंतप्रधान ह्या लॉकडाउनचा निर्णय घेणाऱ्या सरकारच्या प्रमुख आहेत. त्यांनीच नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड वसूल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.