हाथरस प्रकरणाच्या चौकशीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली – अवघ्या देशाला हादरून सोडणाऱ्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने याबाबत सुनावणी करताना प्रकरणाचा तपास सीबीआय अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करेल असं सांगितलं. यासोबतच पीडित व साक्षीदारांच्या सुरक्षिततेवरही उच्च न्यायालय लक्ष देईल असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं.

तत्पूर्वी, हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांनी प्रकरणाची सुनावणी दिल्लीत व्हावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने प्रकरणाच्या तपासानंतर सुनावणी दिल्लीत घ्यायची की नाही याबाबतचा निर्णय न्यायालयातर्फे घेण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता सीबीआयला प्रकरणाच्या तपासासंदर्भातला तपशील अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे सोपवावा लागणार आहे.

हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली होती. पीडितेच्या मृत्यूनंतर तिचे शव कुटुंबियांना न सोपवत उत्तर प्रदेश पोलिसांनी परस्पर धन केले होते. प्रशासनाच्या या वर्तणुकीमुळे उत्तर प्रदेश सरकारला टीकेचा सामना करावा लागला होता.            

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.