म्हसवड – अयोध्येत रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे आणि कार्यकर्त्यांनी म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ मंदिराची झाडू व पाण्याने स्वच्छता केली.
अयोध्येतील श्रीराम मंदिरात सोमवार, दि. 22 रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यानिमित्त भाजपच्यावतीने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यात राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या मंदिरांची स्वच्छता केली जात आहे.
दि. 22 रोजी राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मंदिरातील स्वच्छता मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन या आनंद सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आमदार गोरे यांनीही झाडू हातात घेऊन म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिरात साफसफाई केली. त्यानंतर पाण्याने मंदिर धुवून काढले. आ. गोरे यांना स्वच्छता करताना पाहून, अनेक म्हसवडकर या मोहिमेत सहभागी झाले. यावेळी ‘जय श्रीराम’चा नारा देण्यात आला.