मुंबई : आयपीएल 2022 चा 33 वा सामना आज खेळला जात आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर आमनेसामने आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रवींद्र जडेजाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
#CSK have won the toss and they will bowl first against #MumbaiIndians
Live – https://t.co/d7i5zY6cO2 #MIvCSK #TATAIPL pic.twitter.com/cCOXsXThSY
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
आजच्या सामन्यात मुंबई संघात तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. आजच्या सामन्यात डॅनियल सॅम्स, रिले मेरेडिथ आणि हृतिक शोकीन यांना संधी देण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्जनेही दोन बदल केले आहेत. मोईन अली आणि ख्रिस जॉर्डनच्या जागी मिचेल सँटनर आणि ड्वेन पॅटोरियस यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज :
रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्राव्हो, मुकेश चौधरी, महिश थिकशन.
मुंबई इंडियन्स :
इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, रॉयली मेरेडिथ, हृतिक शोकीन, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह.
दरम्यान, पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि चार वेळा विजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्यासाठी सध्याचा हंगाम निराशाजनक राहिला आहे. दोन्ही संघ प्रत्येकी सहा सामने खेळून गुणतालिकेत तळाशी आहेत. चेन्नईला केवळ एकच विजय मिळाला आहे, तर मुंबईचे खाते अद्याप उघडलेले नाही. चेन्नईचा संघ नवव्या तर मुंबईचा संघ दहाव्या स्थानावर आहे.