मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूझा बऱ्याच काळानंतर अभिनयाच्या दुनियेत परतणार आहे. जेनेलिया तब्बल दहा वर्षांनी अभिनय विश्वात पाऊल ठेवणार आहे. रितेशसोबत तेरे नाल लव हो गया या शेवटच्या चित्रपटात ती दिसली होती. त्यानंतर तिने काही चित्रपटात काम केले पण त्यात तिला हवे तसे यश मिळाले नव्हते. आता जेनेलिया पुन्हा एकदा रितेशसोबत चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच जेनेलियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट बघून चाहत्यांना आनंद झाला आहे.
जेनेलियाने तिच्या इन्टावर एक पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये तिने तिच्या ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या पोस्टमध्ये रितेश बेबीबंपसोबत दिसत आहे. त्यानंतर एका फोटोत रितेश आणि जिनिलिया दोघेही बेबी बंपसोबत दिसत आहेत. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट असणार आहे. पोस्टरमध्ये रितेश आणि जेनेलिया दोघेही गरोदर दिसत आहेत. यामध्ये जेनेलिया हसताना दिसून येत आहेत तर रितेश अस्वस्थ दिसत आहे.