नवी दिल्ली – उत्तर कोरियाने आपल्या क्षेपणास्त्र चाचण्यांची शृंखला सुरू ठेवली आहे. पुल्हावसल-३-३१ असे नाव असलेल्या या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी बुधवारी घेण्यात आली, असे उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
हे नवीन क्षेपणास्त्र अजून विकसित होण्याची प्रक्रीया सुरू आहे. या नव्या क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे शेजारच्या कोणत्याही देशांच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण झाला नाही, असेही उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. प्रादेशिक परिस्थितीशी या क्षेपणास्त्राच्या चाचणीचा काहीही संबंध नसल्याचेही या वृत्तामध्ये म्हटले आहे.
दक्षिण कोरियानेही उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उत्तर कोरियाने पश्चिम किनार्यावरील समुद्रात अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे डागल्याचे आढळले आहे, असे . दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले मात्र दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफने क्षेपणास्त्रांची संख्या किंवा त्यांच्या उड्डाण वैशिष्ट्यांसह अधिक तपशील दिला नाही.