लंडन – ब्रिटनच्या अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी गेल्या आठवड्यात अपयशी ठरली होती. पाणबुडीवरून सोडण्यात आलेले हे क्षेपणास्त्र नाट्यमयरित्या समुद्रात कोसळले होते. ब्रिटनचे संरक्षण मंत्री ग्रॅन्ट शाप्स यांच्या उपस्थितीतच ट्रिडेन्ट क्षेपणास्त्राची ही चाचणी अपयशी ठरली होती.
ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने चाचणी अपयशी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र ब्रिटनच्या आण्विक घातक शस्त्रनिर्मितीच्या निर्धारावर याचा परिणाम झाला नसल्याचेही संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. ब्रिटन सरकारने संरक्षण सिद्धतेबाबत अधिक खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.
चाचणी अपयशी ठरणे ही एक चिंताजनक गोष्ट असून सरकारने यासंदर्भात संसदेमध्ये अधिक काळजी घेण्याचे आश्वासन द्यायला हवे. तसेच अण्वस्त्र सिद्धतेबाबतची ब्रिटनची कटिबद्धताही स्पष्ट व्हायला हवी, असे लेबर पार्टीचे विरोधी पक्ष नेते जॉन हिले यांनी म्हटले आहे.