नवी दिल्ली : चंदीगड गर्ल हरनाझ संधूने विश्वसुंदरीचा किताब मिळवला आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली आहे. तब्बल २१ वर्षानंतर भारताला मिस यूनिवर्सचा खिताब मिळाला आहे. तिच्या आधी 21 वर्षांपूर्वी लारा दत्ताने २००० साली मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता.
मैं एक सामान्य अभिनेत्री नहीं बनना चाहती हूं, मैं एक प्रभावशाली अभिनेत्री बनना चाहती हूं जो मजबूत किरदार चुने और रूढ़ियों को तोड़े कि औरतें क्या हैं और वो क्या कर सकती हैं। मैं अपने अभिनय से लोगों को प्रेरित करना चाहती हूं: हरनाज संधू, मिस यूनिवर्स 2021 pic.twitter.com/5AEUesjawK
— ANI_HindiNews (@AHindinews) December 23, 2021
यानंतर तिने नुकतीच एका वृत्त माध्यमाला मुलाखत दिली यावेळी तिने तिच्या पुढील कामाबाबत सांगितले ती म्हणाली,“मला एक सामान्य अभिनेत्री व्हायचं नाही, तर प्रभावशाली अभिनेत्री व्हायचं आहे. ती पुढे म्हणाली, मला असे अभिनय करायचे आहे ज्यातून स्ट्रॉन्ग स्त्रिया काय आहेत आणि त्या काय करू शकतात हे दाखविता आले पाहिजे. तसेच स्त्रियांविषयी असलेले पारंपारिक विचारा मला त्यातून मोडायचे आहेत. मला माझ्या अभिनयाने लोकांना प्रेरित करायचे आहे”, असे हरनाज म्हणाली.