केरळमध्ये घडली धक्कादायक घटना; वडिलांसह तीघांना अटक
मल्लपुरम (केरळ) – केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर दोन वर्षांहून अधिक काळ जवळपास 30 जणांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 12 वर्षीय मुलीवर झालेल्या या अत्याचार प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीने जवळपास 30 जणांच्या विरोधात जबाब दिला आहे. या आरोपींनी गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर बलात्कार केला. मात्र, पीडिताला आरोपींची ओळख पटवता आली नाही.
या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांसह तिघांना रविवारी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीच्या वडिलांना अपहरणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यासोबतच अशरफ आणि श्याजू नावाच्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर लैंगिक शोषणाचा आरोप आहे. पीडित मुलीचा जबाब दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आला आहे.
असा झाला खुलासा
आरोपींविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत मुलांच समुपदेशन सुरु असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याच उघडकीस आले आहे. या घटनेनंतर पीडित मुलीला बाल कल्याण आश्रय गृहात करण्यात आली आहे.