मुंबई – राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. असे असताना आज मुंबईतील भायखळा परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आली आहे. कोचिंग क्सासमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा तिच्याच शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
17 वर्षीय विद्यार्थीनी नेहमीप्रमाने कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणीसाठी येत होती. दरम्यान शुक्रवारी शिकवणी साठी ही विद्यार्थीनी आली असता येथील शिक्षकाने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा करण्याचा प्रयत्न केला.
किशोर जाधव (वय – 29) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरुद्ध भायखळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनयभंग आणि पोस्को कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास भायखळा पोलीस करत आहेत.