नवी दिल्ली – कसोटी क्रिकेट जंटलमेन्स गेम म्हणून ओळख असलेल्या क्रिकेटचे सर्वात जुने स्वरूप आहे. अलिकडील एकदिवसीय क्रिकेट, टी20 आणि लीग स्पर्धेंच्या काळातही कसोटी क्रिकेटने आपले स्थान अबाधित ठेवले आहे.
क्रिकेट हा आकड्यांचा खेळ असल्याने, कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम मोडणारे खेळाडू आले आणि गेले. मात्र असे काही खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत असे विश्वविक्रम केले आहेत.
ज्यापर्यंत येत्या काही दशतकांत या विक्रमांपर्यंत पोहचणे अत्यंत कठीण असणार आहे. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील 5 विश्वविक्रमांवर आपण प्रकाश टाकणार आहोत.
1) ग्रॅम स्मिथ- कर्णधार म्हणून 109 कसोटी
ग्रॅम स्मिथ 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेच नेतृत्व करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आणि त्यानंतरचा संपूर्ण इतिहास आपल्यासमोर आहे. स्मिथने दक्षिण आफ्रिकेला कसोटी क्रिकेटमध्ये नवीन उंचीवर नेले आणि त्याला सर्वकालीन यशस्वी आणि प्रेरणादायी कर्णधार म्हणून जगभरात ओळख मिळवली.
स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळले. त्याच्या कसोटी कारकिर्दीत (2003 ते 2014), स्मिथने 109 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच नेतृत्व केले, यामधेय 53 सामने जिंकले आणि फक्त 29 सामने गमावले. इतकेच नव्हे तरकर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.
2) राहुल द्रविड – सर्वाधिक 210 झेल
भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड हा केवळ एक अत्यंत कुशल कसोटी फलंदाजच नव्हे, तर एक उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणूनही क्रिकेट जगतात त्याची ख्याती होती. आंतरराष्ट्रीय कारिर्दीत 164 कसोटी सामने खेळणारा द्रविड कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांमध्येही
चौथ्या स्थानी आहे. द्रविड त्याच्या खेळाच्या दिवसांत एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता. 164 कसोटीत द्रविडने 210 झेल घेतले आहेत. यामध्ये द्रिवडनंतर 205 झेलांसह श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने दुसर्या स्थानी आहे.
3) श्रीलंका- एका डावातील सर्वोच्च धावसंख्या 952
श्रीलंकेने 1997 मध्ये कोलंबो येथे भारताविरुद्धच्या सामन्यात एका डवा 952 धावा केल्या होत्या, जो आजपर्यंतचा विक्रम आहे. सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्या शतकांनंतर भारताच्या 537 धावांना प्रत्युत्तर देताना श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याच्या 340 आणि रोशन महानामाच्या 225 धावांच्या जोरावर लंके फलंदाजांनी 952 धावा केल्या.
दोन्ही संघांनी प्रत्येकी एक डाव खेळायला मिळाल्याने ही कसोटी अनिर्णित राहिली. पुढील सर्वोत्कृष्ट धावसंख्या म्हणजे इंग्लंडचा 938, ज्या त्यांनी 1938 केल्या होत्या. अगदी अलीकडे, न्यूझीलंडने हॅमिल्टनमध्ये बांगलादेशविरुद्ध 715 धावा केल्या आहेत.
4) अॅलिस्टर कुक- सलग 159 कसोटी खेळण्याचा विक्रम
कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट सलामीवीरांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा, अॅलिस्टर कुक हा इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 161 कसोटीत 45.35 च्या सरासरीने आणि 33 शतकांच्या मदतीने 12472 धावा केल्या आहेत.
कूकच्या फलंदाजीतील कारनाम्यांव्यतिरिक्त, त्याच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे. 11 मे 2006 पासून सप्टेंबर 2018 मधील त्याच्या अंतिम कसोटीपर्यंत, कुक सलगपणे 159 कसोटी सामने खेळणारा जगातील एकमेव खेळाडू आहे. जून 2018 मध्ये, त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅलन बॉर्डरचा सलग 153 कसोटी खेळण्याचा विक्रम मोडला.
5) रिकी पाँटिंग- सर्वाधिक 108 कसोटी जिंकणारा खेळाडू
जवळपास दोन दशकाहून अधिक काळ, ऑस्ट्रेलियाने कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारांमध्ये जागतिक क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवले, यामध्ये रिकी पाँटिंगचा सिंहाचा वाटा होता.
सप्टेंबर 2011 मध्ये, रिकी पाँटिंग हा 100 कसोटी विजयांमध्ये संघाचा भाग असणारा जगातिल पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला. एकूण 108 कसोटी विजयांमध्ये त्याचा सहभाग होता.