करोनाशी लढा देण्यासाठी महिलांना मास्क, हॅंण्डवॉश बनविण्याचे दिले प्रशिक्षण
महिलांना झाला रोजगार उपलब्ध : जीवनावश्यक साहित्याची निर्मिती
नगर (प्रतिनिधी) – महिलांना स्वयंरोजगाराचे धडे देणाऱ्या जन शिक्षण संस्थेचा दिल्ली येथील कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाकडून जन शिक्षण संस्थेचा गौरव करण्यात आला आहे. संस्थेच्या वतीने करोनाशी लढा देण्यासाठी महिलांना मास्क, हॅण्डवॉश व निर्जंतुकीकरण द्रव्य बनविण्याचे प्रशिक्षण दिले. तर मोठ्या प्रमाणात या जीवनावश्यक साहित्याची निर्मिती केली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जन शिक्षण संस्थेने शहरासह जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागात महिला व युवतींना मास्क, हॅण्डवॉश व निर्जंतुकीकरण द्रव्य बनविण्याचे प्रशिक्षण दिले. महिलांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला. तर नागरिकांच्या आरोग्य चांगले राहण्यासाठी या गोष्टींचा तुटवडा भरुन निघाला. संस्थेच्या वतीने बनविण्यात आलेले मास्क जिल्ह्यातील पोलीस, डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, पत्रकारांना मोफत वाटण्यात आले.
संस्थेच्या या कार्याची दखल घेत कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांण्डेय यांनी गौरव पत्र संस्थेला पाठविले आहे. या उपक्रमासाठी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे संचालक डॉ.रामकृष्ण सुरा, संस्थचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राधेश्याम गुंजाळ, अध्यक्ष राहुल गुंजाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
जन शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमास कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, कुंदा शिंदे, अनिल तांदळे, प्रशिक्षिका कमल पवार, कविता वाघेला, वैशाली कार्ले, ममता गड्डम, अंजुम इनामदार, अश्विनी अडसूळ, चैतन्य संस्थेचे अर्जुन कुंभारे, कल्पना सुकाळे, प्रजापती पाईकराव, उज्वला मंदीलकर, नंदेश शिंदे, श्याम शिंदे, डॉ.पुनम ढगे, डॉ.सुरज ढगे यांचे सहकार्य लाभले.