नागपंचमीला महिलांनी केले वृक्षारोपण

टाकळी खातगाव (प्रतिनिधी) -निमगाव वाघा (ता. नगर) येथे नागपंचमी सणानिमित्त शिवारातच वारुळाची पूजा करुन महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावात प्रत्येकाने घरोघरी आणि शिवारात साध्या पध्दतीने नागपंचमी साजरी केली.

या अभियानाप्रसंगी कांचन डोंगरे, राधिका डोंगरे, तेजस्विनी डोंगरे, मंदा डोंगरे उपस्थित होत्या. प्रारंभी महिलांनी वारुळाची पूजा केली. डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा निसर्ग व पर्यावरण मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष नाना डोंगरे म्हणाले की, वृक्षरोपण व संवर्धन लोकचळवळ होण्यासाठी सण, जयंती व उत्सवाच्या माध्यमातून रोपांची लागवड होणे आवश्‍यक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.