उत्तरप्रदेशातील अपघातात मंत्र्याच्या मुलाचे निधन

बरेली – उत्तराखंडचे शिक्षण मंत्री अरविंद पांडे यांचे चिरंजीव अंकुर (वय 24) यांचे काल रात्री उत्तरप्रदेशातील गोरखपुर येथील रस्ते अपघातात निधन झाले. ते तेथे एका लग्न समारंभासाठी गेले होते. या जिल्ह्यातील फरीदपुर भागात लखनौ रस्त्यावर हा अपघात झाला. त्यात अंकुर यांच्यासह त्यांचे मित्र मुन्नी गिरी हेही ठार झाले.त्यांचे आणखी एक सहकारीही यात गंभीर जखमी झाले आहेत.

हे सर्वजण ज्या मोटार कार मधून जात होते, त्या कारला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. मुख्यंत्री योगी अदित्यनाथ यांनी या अपघाताबद्दल दुख: व्यक्त केले असून त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना आपल्या संवेदना कळवल्या आहेत. ट्रक ड्रायव्हर या घटनेनंतर पळून गेला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.