नवी दिल्ली – दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मोठी कारवाई केली आहे. जैन यांच्या कुटुंबाची आणि कंपन्यांची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने पीएमएलए 2002 अंतर्गत ही कारवाई केली आहे.
सत्येंद्र जैन हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील मंत्री असून त्यांच्याकडे आरोग्य, ऊर्जा, गृह, पीडब्ल्यूडी, उद्योग, शहरी विकास, पूर, सिंचन आणि जल मंत्रालय आहे. यापूर्वी 2018 मध्ये शकूर बस्तीच्या आम आदमी पक्षाच्या (आप) आमदाराच्या प्रकरणासंदर्भात ईडीने त्यांची चौकशीही केली होती.
असे सांगितले जात आहे की, 4.81 कोटी रुपयांची जप्त केलेली स्थावर मालमत्ता ही अकिंचन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडो मेटल इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रयास इन्फोसोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, मंगलायतन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, जे.जे. आयडियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड ही वैभव जैन यांच्या पत्नी स्वाती जैन, अजित प्रसाद जैन यांच्या पत्नी सुशीला जैन आणि सुनील जैन यांच्या पत्नी इंदू जैन यांच्या मालकीची आहे.
Enforcement Directorate (ED), after initiating a money-laundering probe against Delhi Minister Satyendar Jain on the basis of an FIR registered by CBI, provisionally attached immovable properties worth Rs 4.81 crore belonging to his family and firms, under PMLA 2002: ED
— ANI (@ANI) April 5, 2022
शेल कंपन्यांकडून 4.81 कोटी मिळाले –
ईडीच्या तपासात असे आढळून आले की, 2015-16 मध्ये सत्येंद्र जैन हे सार्वजनिक सेवक असताना, शेल कंपन्यांकडून हवाला मार्गाने कोलकाता-स्थित एंट्री ऑपरेटर्सना त्यांच्या मालकीच्या आणि नियंत्रणाखालील कंपन्यांना रोख हस्तांतरणाच्या बदल्यात 4.81 कोटी रुपये मिळाले. ईडीने आपल्या अहवालात नमूद केले आहे की, ही रक्कम थेट जमीन खरेदी करण्यासाठी किंवा दिल्ली आणि आसपासच्या शेतजमीन खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली गेली.
आम आदमी पक्षाच्या नेत्याविरुद्ध ED चा मनी लाँड्रिंगचा खटला ऑगस्ट 2017 मध्ये केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने त्यांच्या आणि इतरांविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याबद्दल दाखल केलेल्या एफआयआरशी संबंधित आहे.