पुणे – शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात वाढ झाल्यामुळे हुडहुडी भरणार्या थंडीचा जोर कमी झाला आहे. मागील चार दिवसांपासून शहरातील किमान तापमान 8 वरून 12 ते 13 अंशाच्या पुढे गेले आहे. त्यामुळे दुपारी ऊन आणि रात्री थंडी असा अनुभव पुणेकर घेत आहे.
मंगळवारी (दि. 30) शहराच्या मध्यवर्ती भागात किमान तापमान 13.6 अंश सेल्सिअस इतके होते. दरम्यान पुढील तीन दिवसात किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असून, रात्रीच्या थंडीसह दुपारीही थंडी जाणवले, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.