कैरो – कैरो शहर पोलिसांनी एका कोट्यधीश भिकारी महिलेला अटक केली आहे. तिच्या बँक खात्यामध्ये पोलिसांना तब्बल ३० लाख इजिप्शिअन पौंड्स म्हणजेच सुमारे डिड कोटी रुपये सापडले आहेत.
नफिसा नावाची हि महिला शहरात ठिकठिकाणी व्हीलचेअरवर बसून भीक मागत असे, पण भीक मागून ती व्हीलचेअरवरून उठून रस्त्याने चालताना दिसत असे. अपंग नसतानाही ती अशाप्रकारे भीक मागून लोकांना फसवत असल्यानेच पोलिसांना हि कारवाई करावी लागली.
तपास सुरु असतानाच पोलिसांना नफीसाची खरी आर्थिक स्थिती समजली. इजिप्तमध्ये घरबीआ आणि कोलिब या भागात तिच्या मालकीच्या ५ इमारती असल्याचेही उघडकीस आले. तसेच तिच्या बँक खात्यामध्ये तब्बल ३० लाख इजिप्शिअन पौंड्स जमा असल्याचे समोर आले.