पाटण – महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाणाऱ्या कोयना धरणाचा परिसर शनिवारी दुपारी 2 वाजून 14 मिनिटांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल एवढी नोंदवली आहे. धक्क्याचे स्वरूप सौम्य असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले.
दरम्यान भूकंपाचा केंद्रबिंदू हा कोयना धरणापासून 8 किलोमीटर हेळवाक गावच्या नैऋत्येस सहा किलोमीटर अंतरावर आढळून आला आहे कोयना तसेच पाटण परिसरात हा भूकंप जाणवला.
शनिवारी दुपारी झालेल्या भूकंपाने कोयना धरण परिसरात तसेच पाटण तालुक्यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता मध्यम स्वरूपाची नोंदविण्यात आली असून भूकंपाचे स्वरूप सौम्य असल्याने कोणतीही जीवित व वित्त हानी नसल्याचे धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले.