नांदेड : मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात काल मध्यरात्री भूकंपाचा सौम्य धक्का बसला असल्याचे सांगण्यात येत आहे. जवळपास 3 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती. नांदेडमधील मुदखेड याठिकाणी रात्री 12.03 वाजता रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, मुदखेड तालुक्यातील नागेली, तिरकसवाडी,पाथरवाडी या तीन गावांपैकी या भूकंपाचे केंद्र आहे. भूकंप मापक वेब साईटवर भूकंप झाल्याचे दिसत आहे.
मात्र विद्यापीठाच्या भूगर्भ विभागाने याविषयी अधिकृत माहिती दिली नसल्याचे नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटले आहे.
केवळ महाराष्ट्रातील नांदेडमध्येच नाही तर हिमाचल प्रदेश आणि मणिपूरमध्येही भूकंपाच धक्के जाणवले. 33 मिनिटात तीन राज्यांमध्ये भूकंप झाला.