Bollywood । अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तो देशातील सर्वात मोठा सुपरस्टार आहे परंतु अलीकडच्या काळात त्याचा एकही चित्रपट चाहत्यांना फारसा प्रभावी वाटला नाही. त्यामुळे त्याचे चाहते आजही त्याच्या आगामी चित्रपटांवर लक्ष ठेवून आहेत.
अशातच अभिनेत्याचा एक जुना फोटो व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो ( टक्कल ) बाल्ड लूकमध्ये दिसत आहे. या फोटोत हृतिक रोशनसोबत तो पोज देताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये सलमान खान कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे, यात तो आपला टक्कल दाखवत आहे. फोटोमध्ये सलमान शर्टलेस आणि वर लेदर जॅकेट घातलेला दिसत आहे.
सलमानच्या टक्कल लूकवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान हा फोटो सलमानच्या कोणत्याही आगामी चित्रपटाचा नाही किंवा अलीकडच्या काळात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा नाही. उलट, हा एक थ्रोबॅक फोटो आहे ज्याने आता लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चाहते फोटोवर उत्साहाने कमेंट करत आहेत.
दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान करण जोहरच्या द बुलची तयारी करत होता. मात्र, त्यांच्यातील मतभेदांमुळे हा चित्रपट तूर्तास थांबवण्यात आला आहे. सलमान आता सिकंदरवर काम करत असून तो रश्मिका मंदान्नासोबत या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गजनी फेम एआर मुरुगदास करत आहेत.