पुणे -सर्वसामान्य नागरिकांचा “म्हाडा’वर विश्वास आहे. त्यामुळे “म्हाडा’च्या घरासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात अर्ज करतात. सर्वसामान्य नागरिकांचा हा विश्वास “म्हाडा’ने जपावा,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
शासकीय विश्रामगृह येथे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या 2,703 नवीन सदनिका व 58 व्यापारी संकुलासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते झाला.
यावेळी खासदार ऍड. वंदना चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते. पवार म्हणाले, करोना संकटकाळात मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला उर्जितावस्था मिळाली.