पुणे – पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 5 हजार 863 सदनिकांची सोडत शुक्रवारी (दि.24) होणार होती. मात्र, प्रशासकीय कारणास्तव ही सोडत पुढे ढकलण्यात आल्याचे “म्हाडा’कडून सांगण्यात आले. सोडतीची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
“म्हाडा’च्या 5 हजार 863 घरांसाठी 59 हजार 766 इतके अर्ज आले आहेत. पुणे विभागाने गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, पंतप्रधान आवास योजनेतील 431 सदनिका, 15 टक्के सामाजिक गृहयोजनेतील 344 सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील 2 हजार 445 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2,445 सदनिकांची सोडत काढण्यात येणार आहे.