हॉलिवूडमधील अभिनेत्री किम कार्दशियनकडे ‘ड्रामा क्वीन’ म्हणून पाहिलं जातं. ती नेहमीच तिच्या अजब गजब फॅशन आणि विधानांमुळे चर्चेत असते. तिचे फोटो शूट नेहमीच सोशलवर तुफान व्हायरल होत असतात.
View this post on Instagram
गेल्या वर्षांमध्ये मांग टिका आणि हातात सोन्याच्या बांगड्या घालून फोटोशूट केल्याने किम कार्दशियन ट्रोल झाली होती. किम तिच्या अभिनयापेक्षा चित्रविचित्र पेहराव, वादग्रस्त वक्तव्य, लीक होणारे खासगी व्हिडीओ आणि बोल्ड फोटोशूटमुळे सतत चर्चेत असते. यावेळी किम पुन्हा एकदा सोशलवर चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
मेट गाला 2022 या फॅशनच्या सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये, 2 मेला सर्व सेलेब्सने त्यांच्या फॅशन आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आले. सेलेब्स एकापेक्षा जास्त आउटफिटमध्ये दिसले. याच फॅशन इव्हेंटमध्ये किम कार्दशियनने देखील तिच्या बॉयफ्रेंडसह उपस्थित राहून कार्यक्रमाची प्रशंसा केली.
View this post on Instagram
पण यावेळी किमच्या ग्लॅमरपेक्षा तिच्या वजन कमी झाल्याची चर्चा झाली. किमने तीन आठवड्यात वजन कमी केले. किम मेट गालामध्ये दिवंगत अभिनेत्री मर्लिन मेन्रोच्या आयकॉनिक लुकमध्ये दिसून आली. मर्लिन मेन्रोच्या गाऊनमध्ये बसण्यासाठी तिने भरपूर घाम गाळला. हा किमचे अवघ्या तीन आठवड्यांत सुमारे साडेसात किलो वजन कमी केले आहे.
View this post on Instagram
किमचा गाऊन मर्लिन मेन्रोची आठवण करून देणारा आहे, जो तिने 19 मे 1962 रोजी मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या वाढदिवसानिमित्त परिधान केला होता. यानंतर तीन महिन्यांच मर्लिनचा मृत्यू झाला. आता किमने पुन्हा एकदा मर्लिनच्या गाऊनमध्ये आयकॉनिक लूक मेट गाला 2022 या फॅशनच्या सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये सादर केला आहे.
View this post on Instagram
किम कार्दशियनने या ड्रेसमधील तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले आहे की,’मॅरिलिन मेन्रोचा हा आयकॉनिक ड्रेस परिधान करून मला खूप गर्व वाटतो आहे. हा आकर्षक स्किनटाइट गाउन कॉस्टुमियर जीन लुईस यांनी 6000 क्रिस्टल्ससह तयार केला असून काही अहवालांनुसार, या ड्रेसची किंमत $ 4.8 दशलक्ष (36,84,93,600 म्हणजेच भारतीय चलनानुसार 36.84 कोटी रुपये) आहे.किमने या ड्रेसला परिधान करण्यासाठी तीन आठवड्यांत सुमारे साडेसात किलो वजन कमी केले आहे.