बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या कारचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीच्या कारला महाकालच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला आहे. या अपघातात तनुश्रीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती स्वत: अभिनेत्रीने सोशल मिडियावर पोस्ट करून दिली आहे.
View this post on Instagram
एकेकाळी बॉलिवूडमध्ये आपल्या ग्लॅमरस अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तनुश्री दत्ताचा नुकताच अपघात झाला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून अपघाताची बातमी दिली आहे. तनुश्रीचा महाकालच्या दर्शनासाठी जात असताना गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे तिचा अपघात झाला. फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले – ”आजचा दिवस साहसांनी भरलेला होता, शेवटी महाकालाच्या दर्शनासाठी पोहोचले. मंदिराकडे जाताना विचित्र अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने कारला धडकली, काही टाके पडले… जय श्री महाकाल.”
दरम्यान, अभिनेत्रीच्या पायाला दुखापत झाली आहे, ज्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.फोटोमध्ये अभिनेत्रीच्या गुडघ्याला खोल दुखापत झाल्याचे दिसून येत आहे.