राजगुरूनगर – येथे 31 डिसेंबरचे औचित्य साधून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीन “नको दारू नको बियर, हॅपी न्यू इयर’, “दारू नको, दूध प्या’ हा अनोखा उपक्रम घेवून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. गेली चार वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे.
राजगुरूनगर येथे पंचायत समितीच्या समोर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून मंगळवारी (31 डिसेंबर) चला व्यसनाला दूर करू या. या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.