नारायणगाव – पुणे-नाशिक महामार्गालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी कारवाई करून 96 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
सुहास रंगनाथ घोलप (वय 27, रा. नारायणवाडी ता. जुन्नर), अजय किसन पाटे (रा. नारायणगाव, ता जुन्नर), विनायक वसंत घोडे (वय 30, रा. चास नारोडी, ता. आंबेगाव), संतोष चंद्रकांत गायकवाड (वय 37, रा. नारायणगाव ता. जुन्नर) यांच्यावर कारवाई केली आहे. फिर्याद पोलीस शिपाई स्वप्निल मछिंद्र लोहार यांनी दिली आहे.
नारायणगाव एसटी स्टॅंडपासून आळेफाट्याकडे फुलसुंदर मार्केट शेजारील देशी दारूच्या दुकानाशेजारी असलेल्या पत्राशेडमध्ये रविवारी (दि. 30) सायंकाळी 6 च्या सुमारास बेकायदा आणि बिगर परवाना ऑनलाइन जुगार खेळत असताना सापडले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन घोडे, पोलीस हवालदार कोकणे, पोलीस शिपाई लोहार, शाम जायभाये, वाघमारे यांनी केली.