Vijay Sethupathi – Katrina Kaif : अभिनेत्री कतरिना कैफ सध्या ‘टायगर 3’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. मात्र, आगामी काळात ही अभिनेत्री अनेक उत्तमोत्तम प्रोजेक्ट्समध्ये काम करून तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. या प्रोजेक्ट्समध्ये विजय सेतुपतीसोबत कॅटरिनाच्या ‘मेरी ख्रिसमस’चाही समावेश आहे. दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाबाबत चाहते खूप उत्सुक आहेत.
कतरिना आणि विजय सेतुपती यांची जोडी लवकरात लवकर या चित्रपटात पाहायला सर्वांनाच इच्छा आहे, पण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सारखी लांबणीवर जात आहे. चित्रपटाचा वास्तविक या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुहूर्त मिळेना. हा चित्रपट आता पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.
सध्या कतरिना कैफ तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच चित्रपटांमुळे चर्चेत आहे. ‘टायगर 3’ने बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवणाऱ्या कतरिना कैफचे चाहते ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटाच्या घोषणेपासूनच त्याची प्रतीक्षा करत आहेत. मात्र, श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनात वारंवार बदल करण्यात येत आहेत. याआधी हा चित्रपट १५ डिसेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत होती, मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.
‘मेरी ख्रिसमस’ आता 12 जानेवारी 2024 रोजी रुपेरी पडद्यावर येणार आहे. निर्मात्यांनी शेअर केलेल्या निवेदनात ते म्हणाले, ‘आम्ही हा चित्रपट प्रत्येक चित्रपट निर्मात्याप्रमाणे खूप प्रेम आणि उत्कटतेने बनवला आहे. बॅक टू बॅक चित्रपट रिलीज आणि 2023 चे शेवटचे दोन महिने भरलेले असताना, आम्ही आनंदाचा हंगाम वाढवण्याचा आणि आमचा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे.’