पुणे : मार्केटयार्डातील व्यापाऱ्याचे अपहरण; दीड कोटी रुपयांची खंडणी 

पुणे,दि.15- मार्केटयार्डमधील बांधकाम व्यावसायिकांच्या वडिलांचे अपहरण करून दीड कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करुन पकडले. रात्रभर सुरु असलेल्या या मोहिमेत आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार एका बांधकाम व्यावसायिकाच्या 65 वर्षांच्या वडिलांचा मार्केटयार्डमध्ये व्यापारी गाळा आहे. मार्केटयार्डमधील दुकान बंद करुन ते रात्री घरी जात होते. यावेळी गुन्हेगारांनी मार्केटयार्ड येथील वखार महामंडळासमोरुन त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांनी मुलाच्या मोबाईलवर कॉल करुन दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. ती दिली नाही तर वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी अपहरणाची ही माहिती तातडीने गुन्हे शाखेला दिली.

गुन्हे शाखेची पथके लागलीच आरोपींच्या मागावर लागली. अपहरणकर्त्यांनी मध्यरात्री एका ठिकाणी पैसे आणून देण्यास सांगितले होते. त्यानुसार एका बॅगेत पैसे ठेवून ती बॅग तेथे ठेवण्यात आली. यावेळी पोलीस सभोवताली पातळीवर होते. मात्र, गुन्हेगारांनी पैशाची बॅग घेऊन धुम ठोकली त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पैसे घेण्यासाठी आलेल्यांना पकडले.

Leave A Reply

Your email address will not be published.