नवी दिल्ली: कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आयएनएक्स मीडियाच्या ईडीशी संबंधित प्रकरणात त्यांना जामीन देण्यास नकार दिला आहे.
जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, “हे आरोप खूप गंभीर आहेत आणि यामध्ये आरोपींची मुख्य भूमिका आहे” दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेश कैथ यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, “जर या टप्प्यावर चिदंबरम यांना जामीन दिला तर 70 बेनामी बँक खात्यांसह शेल कंपन्या आणि पैशाचा मागोवा सिद्ध करणे तपास यंत्रणेला अवघड जाईल, म्हणून जनहितात जामीन रद्द करण्यात येत आहे. या गुन्ह्यामुळे देशाला मोठा आर्थिक फटका बसला आहे”