अझाझ (सिरीया)- सिरीयाच्या उत्तर पश्चिमेकडील बंडखोरांच्या ताब्यातील अत्यंत गजबजाटाची बाजारपेठ आणि मशिदीच्या जवळ झालेल्या एका कारबॉम्बच्या स्फोटात किमान 19 जण ठरा झाले. यामध्ये चार ब्लकंचाही समावेश आहे. अलेप्पो प्रांतातील तुर्कीच्या प्रभावक्षेत्रातल्या अझाझ या भागामध्ये हा कार बॉम्बस्फोट घडवण्यात आला असे सिरीयातील मानवी हक्कविषयक गटाने म्हटले आहे. या बॉम्बस्फोटामध्ये 20 पेक्षा अधिक जण जखमीही झले आहेत, असे या ब्रिटनस्थित निरीक्षक गटाने म्हटले आहे.
हा स्फोट झाला तेंव्हा जवळच्याच मशिदीमधून संध्याकाळची प्रार्थना संपवून नागरिक बाहेर पडत होते. काही दिवसांवर आलेल्या ईद उल फित्रच्या निमित्ताने बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली होती, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. हा स्फोट इतका मोठा होता की बाजारपेठेतील 6 दुकने जळून खाक झाली, तर जवळपास डझनभर अन्य दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.
या स्फोटामागे कोणाचा हात होता, हे स्पष्ट झालेले नाही. एकच दिवस आगोदर उत्तर पश्चिमेकडील राका शहरातही अशाच प्रकारचा स्फोट झाला होता. त्यात 20 जण ठार झाले होते.