सातारा- जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र सुधाकर चांदेकर आणि व्हाइस चेअरमनपदी विनोद वामन ननावरे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.
पतसंस्थेच्या पदाधिकार्यांची निवड जिल्हा परिषद परिचर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र संकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. चेअरमनपदी राजेंद्र चांदेकर व व्हाइस चेअरमनपदी विनोद ननावरे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी संचालक अस्लम मुल्ला, जगन्नाथ नावडकर,
किरण सिंदकर, संजय जाधव, सौ. शोभा पिसाळ, सुरेश वायदंडे, सौ. छाया ढाणे, संदीप क्षीरसागर, सीताराम विटकर, शशिकांत पाटील, शरद पवार, विलास शिंदे, विजय खाडे, तज्ज्ञ संचालक महेश गुरव, बाळासाहेब घोलप, सचिव सौ. सुजाता सोनावणे, लिपिक नीलेश भोसले, सल्लागार विजय पवार, रूपचंद भांड, श्रीमती जयश्री थोरात, संभाजी क्षीरसागर, सय्यद शेख, महेश शेंडगे उपस्थित होते. सर्वांना विश्वासात घेऊन, सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही नूतन चेअरमन व व्हाइस चेअरमन यांनी दिली.