शिवानी बोरकर ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : ‘लागिरं झालं जी’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेतल्या अज्या आणि शीतलीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. दरम्यान, मालिका जरी संपली असली तरी देखील या व्यक्तिरेखांचा उल्लेख मात्र प्रेक्षक आवर्जून करतात. परंतु, आता शीतलीच्या अर्थात शिवानी बोरकरच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. शिवानी बोरकर नव्या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीलाशवानी बावकर पुन्हा एकदा एका नव्या मालिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

#sareevibes

A post shared by Shivani Baokar (@shivanibaokar) on Jul 13, 2019 at 10:21am PDT

झी मराठीवरील आगामी ‘आलटी पालटी’ या मालिकेत शिवानी मुख्य भूमिकेत चमकणार असून यात ती एक ठग म्हणून दिसेल. मालिका आणि मालिकेतील इतर कलाकारांबद्दलची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. लवकरच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस येईल. लोकप्रिय मालिका संपल्यानंतर आपला आवडता कलाकार पुन्हा कोणत्या भूमिकेत दिसणार या विषयी चाहत्यांना उत्सुकता असते. टीव्ही कलाकार मालिका संपल्यावर नाटक किंवा चित्रपटाकडे वळताना दिसतात. शिवानी म्हणते कि, “मला अभिनय करायचा आहे मग तो टीव्ही असो किंवा इतर कुठलंही माध्यम. शीतलच्या भूमिकेने मला काम करण्याचं समाधान दिलं आणि प्रसिद्धी मिळवून दिली. आता मी जी भूमिका स्वीकारली आहे ती शीतलच्या अगदी विरुद्ध आहे. शूटिंगच्या वेळी मला फार त्रास होत नाही. हा सगळा माहोल आणि काम आवडतंय म्हणूनच मी हे करतेय.”

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)