नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील ‘मेरठ’चे नाव बदलून ‘नथुराम गोडसे नगर’ करण्याची घोषणा हिंदू महासभेच्यावतीने करण्यात आली. या घोषणेनंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मेरठमध्ये होणाऱ्या आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका लक्षात घेऊन ही घोषणा करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
हिंदू महासभेने मंगळवारी मंगळवारी निवडणुकांसाठीचा आपला जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी मेरठ नगरपालिकेची निवडणूक जिंकली तर मेरठ हे नाव बदलून नथुराम गोडसे नाव देऊ अशी घोषणा यावेळी करण्यात आली. आगामी काळात होणाऱ्या सर्वच निवडणुकांसाठी हिंदू महासभा इच्छुक असल्याचे यावेळी दिसून आले.
Will rename Meerut as Nathuram Godse Nagar if our candidate is elected the mayor in the upcoming municipal polls.
Islamic names of various places will also be changed to those of great Hindu men: Hindu Mahasabha— Press Trust of India (@PTI_News) November 22, 2022
मेरठमधील हिंदू महासभेच्या ऑफिसमध्ये महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचे मंदिर देखील बांधले आहे. मेरठमध्ये हिंदू महासभा विजयी झाली तर जिल्ह्याचं नाव नथूराम गोडसे नगर केलं जाईल. तसेच शहरातील इतर ठिकाणांची नावं बदलून हिंदू महापुरुषांच्या नावाने ठेवली जातील अशी घोषणा महासभेच्यावतीने यावेळी करण्यात आली.