रियाध – सौदी अरेबियातील कायदे अत्यंत कडक आहेत या देशात इस्लामी परंपरेप्रमाणे शरियत कायद्याचे पालन केले जाते मुळेच या देशांमध्ये गुन्ह्यांच्या खटल्यांचे निकाल ही जलद लागतात आणि शिक्षाही जलद दिल्या जातात गेल्या 10 दिवसांमध्ये तब्बल 12 लोकांचा शिक्षा म्हणून शिरच्छेद करण्यात आला असून त्यापैकी बहुतेक जणांचा अमली पदार्थांच्या व्यापाऱ्यांमध्ये सहभाग होता ज्या लोकांना अशा प्रकारची शिक्षा देण्यात आली त्यामध्ये तीन पाकिस्तानी होते.
सप्टेंबर महिन्यामध्ये सौदी अरेबियाच्या पोलिसांनी रियादमधील एका गोडाऊन मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते यावेळी ज्या 12 लोकांना अटक करण्यात आली होती त्यांच्यावर त्वरित खटला चालवण्यात येऊन त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आणि शिरच्छेद करण्यात आला त्यामध्ये तीन पाकिस्तानी नागरिक 4 सिरीयन नागरिक 2 जॉर्डनचे नागरिक आणि तीन सौदी अरेबियातील रहिवासी होते अंमली पदार्थांच्या व्यापाऱ्या बाबत सौदी अरेबियाचे कायदे अतिशय कडक असून या गुन्ह्यात सापडणाऱ्या लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते सौदी अरेबियात लागू असलेल्या शरियत कायद्याप्रमाणे खून खुनाचा प्रयत्न अंमली पदार्थ व्यापार दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग समलैंगिक संबंध ठेवणे मालमत्तेवर चुकीचा अधिकार सांगणे यासारख्या गुन्ह्यांसाठी सुद्धा मृत्युदंडची शिक्षा दिली जाते.
सौदी अरेबियामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये अशा प्रकारच्या विविध गुन्ह्यांखाली तब्बल 300 लोकांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे या देशामध्ये एखाद्या गुन्हेगाराला जर मृत्य दंडाची शिक्षा ठोठावली तर ही शिक्षा अंमलात आणण्यासाठी शिरच्छेद करणे दोराने फाशी देणे किंवा गोळीबार करून मारणे या मार्गांचा अवलंब केला जातो जागतिक स्तरावर विचार करता फाशी देण्यामध्ये चीनचा क्रमांक पहिला असून एक 2020 या एका वर्षामध्ये चीनमध्ये 1000 पेक्षा जास्त लोकांना फासावर चढवण्यात आले होते याच एका वर्षामध्ये भारतामध्ये मात्र फक्त चार जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती.