पुणे: राज्य सामाईक प्रवेश कक्षाकडून घेण्यात आलेल्या एमएएच-एमबीए आणि एमएमएस या अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचा निकाल उद्या (दि.23) सकाळी अकरा वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
मॉस्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (एमबीए) आणि मास्टर इन मॅनेजमेंट स्टडिज् (एमएमएस) या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटी दि. 14 व 15 मार्च 2020 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेला 1 लाख 10 हजार 631 उमेदवार बसले होते. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली.