- दिवसभरात 63 करोनाबाधित; सक्रिय रुग्णसंख्या 475
वडगाव मावळ – मावळ तालुक्यात रविवारी (दि. 21) 63 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सक्रिय रुग्णांची संख्या 475 आहे.
रविवारी तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 33 रुग्ण व वडगाव नगरपंचायत हद्दीत 6 रुग्ण आढळले. लोणावळा हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही.
सध्या रुग्णालयात 475 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 9 हजार 009 झाली आहे. तर दिवसभरात 20 जणांना “डिस्चार्ज’ देण्यात आला.
रविवारी आढळलेल्या करोना रुग्णांमध्ये शहरी भागात 39 रुग्ण. ग्रामीण भागात कामशेत 10, आंबी 5, वराळे 4, सोमाटणे 2, ओझर्डे, नवलाख उंब्रे व नानोली तर्फे चाकण प्रत्येकी 1 एकूण 24 रुग्ण आढळले.
आतापर्यंत 8 हजार 303 जणांना “डिस्चार्ज’ देण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 232 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2 हजार 831, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1 हजार 718 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 593 व्यक्तींना बाधा झाली आहेत.
शहरी भागात 5 हजार 142 रुग्ण, तर ग्रामीण भागात 3 हजार 867 रुग्ण आढळून आले आहेत. सध्या एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.