गंगटोक(सिक्कीम) :– सिक्कीममधील नाथूला सीमावर्ती भागात मंगळवार मोठे हिमस्खलन झाले. या घटनेत आत्तापर्यंत 6 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर अद्यापही 150 पर्यटक बर्फाखाली अडकल्याची भीती स्थानिक अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
Massive avalanche hits tourists between Mile 13 & 17 on #Gangtok-Natu La Road. Troops of #TrishaktiCorps assisted by #BRO, SDRF & Police launch rescue mission. 27 personnel rescued so far out of which 7 succumbed to tragic incident. Rescue mission continues@adgpi @easterncomd pic.twitter.com/iItcd1Xl5u
— Trishakticorps_IA (@trishakticorps) April 4, 2023
मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. हिमस्खलनानंतर गंगटोक ते नाथू ला जोडणाऱ्या 15 व्या मैल जवाहरलाल नेहरू मार्गावर बचावकार्य सुरू आहे. तसेच अत्तापर्यंत बर्फात अडकलेल्या 27 पर्यटकांची सुटका करण्यात आली असून त्यांना गंगटोक येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच रस्ता मोकळा केल्यानंतर अडकलेल्या 350 पर्यटकांची आणि 80 वाहनांची सुटका पोलिसांकडून करण्यात आली आहे.
Rajasthan : मुख्यमंत्री गहलोत पाठोपाठ माजी मुख्यमंत्री ‘वसुंधरा राजे’ही Covid-19 पॉझिटिव्ह
भारत-चीन सीमेजवळील नाथू ला या उंच पर्वतीय खिंडीजवळ दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हे हिमस्खलन झाले. हिल पास समुद्रसपाटीपासून 4,310 मीटर (14,140फूट) उंचीवर आहे आणि एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.