दिल्ली : आयपीएलच्या 16व्या हंगामातील सातव्या सामन्यात गुजरात टायटन्स संघ दिल्ली कॅपिटल्ससमोर आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे.
या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Gujarat Titans have won the toss and elect to bowl first against DelhiCapitals).
Gujarat Titans have won the toss and elect to bowl first against @DelhiCapitals
Live – https://t.co/9Zy9HcuWS6 #TATAIPL #DCvGT #IPL2023 pic.twitter.com/q43LKdiAHm
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2023
दिल्लीला मोसमातील पहिल्या विजयाचे वेध लागले आहेत. गेल्या सामन्यात दिल्लीला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी गुजरातने पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला.