Mary Kom Retirement : भारताला 2012 मध्ये ऑलिम्पिकमध्ये विजेतेपद मिळवून देणारी मेरी कोम बॉक्सिंगमधून निवृत्त होणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती. या संदर्भात काही बातम्या समोर आल्या होत्या. मात्र याबाबत स्वत: मेरी कोमने खुलासा केला आहे. माझ्या रिटायरमेंटचे वृत्त चुकीचे असून मी असा कोणताही निर्णय घेतला नाही, असं मेरी कोम यांनी सांगत चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.
बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम म्हणाल्या की, “मी अद्याप निवृत्तीची घोषणा केलेली नाही आणि माझ्याबद्दल चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. मला जेव्हा ही घोषणा करायची असेल तेव्हा मी वैयक्तिकरित्या मीडियासमोर येईन. मी निवृत्तीची घोषणा केली आहे आणि हे सांगणारे काही मीडिया रिपोर्ट्स मी पाहिले आहेत. परंतु हे सत्य नाही.”
Boxing champion Mary Kom says, “I haven’t announced retirement yet and I have been misquoted. I will personally come in front of media whenever I want to announce it. I have gone through some media reports stating that I have announced retirement and this is not true. I was… pic.twitter.com/VxAcFsq44v
— ANI (@ANI) January 25, 2024
पुढे त्या म्हणाल्या की, “24 जानेवारी 2024 रोजी दिब्रुगढ येथे एका शाळेच्या कार्यक्रमात गेले होते. तिथे बोलताना, मी निवृत्तीबाबत विधान केले होते. मात्र, मला अजूनही बॉक्सिंगमध्ये खूप यश मिळवण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी माझ्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करीत आहे. जेव्हा मी निवृत्तीची घोषणा करेन तेव्हा मी सर्वांना माहिती देईल,” असे त्यांनी निवृत्तीच्या अफवांवर स्पष्टीकरण दिले.इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन (IBA) च्या नियमांनुसार, पुरुष आणि महिला बॉक्सर्सना फक्त 40 वर्षे वयापर्यंत स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी आहे. मात्र आता मेरी कोमचं वय 41 झालं आहे.
मेरी कोम यांची कामगिरी –
- मेरी कोम यांनी जागतिक बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत तब्बल 6 वेळा जगज्जेतेपद मिळवलं आहे. हा रेकॉर्ड करणाऱ्या त्या ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे.
- वर्ल्ड चँपियनशिपमध्ये 7 वेळा पदक जिंकण्याच्या रेकॉर्डही मेरी कोमच्या नावावर आहे.
- 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिक गेम्समधल्या 51 किलो वजनी गटात तिने कांस्य पदक जिंकलं आहे.
- 2018 मध्ये मणिपूर सरकारने तिच्या बॉक्सिंगमधील कारकिर्दीसाठी मीथोई लीमा उपाधी देऊन गौरवलं होतं.
- मेरी कोमला पद्मश्री, पद्म भूषण, अर्जुन पुरस्कार आणि इतर पुरस्कारनेही गौरवण्यात आले आहे.