नवी दिल्ली – डिझेलचे दर आणि कारचा उत्पादन खर्च पाहता छोट्या डिझेल कार तयार करणे किफायतशीर ठरत नाही. त्यामुळे मारुती आगामी काळात अशा कारचे उत्पादन कमी करणार आहे.
कंपनीचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, त्याऐवजी आम्ही सीएनजी कारच्या विकसनावर अधिक लक्ष देणार आहोत. इतर कंपन्यांही डिझेलच्या कार कमी प्रमाणात तयार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. बीएस- 6 प्रकारची वाहने सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे या वाहनांना बाजारपेठेकडून कसा प्रतिसाद मिळतो याचा अंदाज आणखी आम्हाला आलेला नाही, असे ते म्हणाले.