मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार यांची उपस्थिती होती. शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच स्टेजवर उपस्थित असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशात शरद पवार यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत बोचरी टीका केली आहे. शरद पवार यांनी नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नय़े, असा महाविकास आघाडीचा सूर होता. पण शरद पवार पुरस्कार समितीमध्ये असल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
When you see things through a different lens, you realise that the #GormintAunty was right all along.
If you want to switch to the side of Merchant of Hate, Casteism and Death, then just do it. Don’t fool the people of #Maharashtra and India with your breakup stunts.… pic.twitter.com/z5N6GHJ9DK
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 2, 2023
दरम्यान प्रकाश आंबडेकर यांनी बोचरी टीका म्हटले,’जेव्हा तुम्ही गोष्टींकडे दुसऱ्या दृष्टीकोनातून पाहता, त्यावेळी गॉरमिंट आंटी बरोबर असल्याच तुमच्या लक्षात येईल. द्वेष. जातीभेद आणि मृत्यूच्या व्यापाऱ्यांच्या बाजूने तुम्हाला जायचं असेल, तर तुम्ही जाऊ शकता. या तुमच्या ब्रेकअप स्टंटने तुम्ही महाराष्ट्राच्या आणि भारताच्या लोकांना मूर्ख बनवू नका” अशी बोचरी टीका प्रकाश आंबडेकर यांनी केली आहे. तसेच शरद पवार हे नेहमीच दुटप्पी राहिले आहेत. लग्न एकाबरोबर करतात आणि संसार दुसऱ्याबरोबर थाटतात” असं प्रकाश आंबडेकर यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.