पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती मंगळवारी घरोघरी उत्साहज्ञत साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने सार्वजनिक मिरवणुका, शोभायात्रा काढू नयेत, वाद्ये वाजवू नयेत, फटाक्यांची आतषबाजी करू नये. त्याऐवजी घरावर विद्युत रोषणाई करावी. घरामध्येच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्याचे पालन मंगळवारी नागरिकांनी केले.
अनेकांनी जयंतीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करत जयंती साजरी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. पूर्णाकृती पुतळ्यास आणि महानगरपालिका भवन येथील छायाचित्रास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे, सहाय्यक आयुक्त दयानंद सोनकांबळे उपस्थित होते.