मिशेल ओबामावरील टीव्ही सिरीजमध्ये विओला डेव्हिस

भारतात सध्या बायोपिकचा ट्रेंड आहे. बायोपिक सिनेमा करण्यापेक्षा टीव्ही सिरीज करण्याचा ट्रेंड अमेरिकेत येऊ लागला आहे. याच ट्रेंडनुसार अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी आणि माजी “फर्स्ट लेडी’ मिशेल ओबामा यांच्यावर एक टीव्ही सिरीज होत आहे. कृष्णवर्णीय अभिनेत्री विओला डेव्हिस या मिशेल ओबामांचा रोल साकारणार आहे. या टीव्ही सिरीजचे प्रोडक्‍शनदेखील विओला डेव्हिस करणार आहे.

मिशेल ओबामा यांच्या पर्सनल आणि पॉलिटिकल लाईफबाबत या टीव्ही सिरीजमधून विशेष प्रकाश टाकण्यात येणार आहे. या सिरीजमध्ये एकूण तीन “फर्स्ट लेडी’चा जीवनपट उलगडून दाखवण्यात येणार आहे. माजी अध्यक्ष रुझवेल्ट यांच्या पत्नी एलेनर रुझवेल्ट, बॅटी फॉर्ड यांच्यावरील नाट्यरूपांतरही असणार आहे. तिन्ही “फर्स्ट लेडीज’साठी या टीव्ही सीरियल्समध्ये प्रत्येकी एक तासाचा भाग असेल.

विओला डेव्हिस ऑस्कर प्राप्त अभिनेत्री आहेत. त्यांना यापूर्वी “विंडोज’ या थ्रिलर मुव्हीमध्ये प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली होती. मिशेल ओबामा यांच्यावर यापूर्वीही एक सिनेमा बनून गेला आहे. 2016 मध्ये “साउथ साईड विद यु’ हा सिनेमा बनला होता. त्यात टीका समम्पटर यांनी मिशेल ओबामांचा रोल केला होता. पण विओला डेव्हिसची सिरीज सध्या तरी फक्‍त अमेरिकेतल्या शोटाईम आणि लायन्सगेट या डिजिटल प्लॅटफॉर्मवरच दिसणार आहे. कालांतराने ही सिरीज जगभरातल्या चॅनेलवर उपलब्ध होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)