Dainik Prabhat
Wednesday, August 10, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home संपादकीय

मंथन – क्रिप्टोचा गडगडाट

प्रभात सिन्हा

by प्रभात वृत्तसेवा
July 1, 2022 | 10:20 am
A A
मंथन – क्रिप्टोचा गडगडाट

आता क्रिप्टो मार्केटमध्ये घसरणीचे वारे वाहत आहेत. साहजिकच अनेक गुंतवणूकदार क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीची कायमस्वरूपी धास्ती घेतील; परंतु ज्यांचे क्रिप्टोमधील गुंतवणुकीतील स्वारस्य अबाधित राहील, अशा गुंतवणूकदारांची संख्याही कमी नाही.

गेल्या आठ महिन्यांत क्रिप्टो करन्सीच्या बाजारात घसरणच सुरू आहे. बिटकॉइन या सर्वांत लोकप्रिय क्रिप्टो चलनाचे मूल्य नोव्हेंबर 2021 मध्ये 68 हजारांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले असताना, 13 जूनपासून सुरू झालेल्या आठवड्यात मोठी घसरण होऊन ते 20 हजारांच्या खाली पोहोचले. नोव्हेंबर 2021 मध्ये क्रिप्टो करन्सीचे एकत्रित बाजार भांडवल 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले होते. जगातील बहुतेक देशांच्या जीडीपीपेक्षाही ते अधिक आहे; परंतु क्रिप्टो करन्सी मार्केट गेल्या आठ महिन्यांत 2 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक प्रमाणात घटले आहे. बिटकॉइन आणि तिची जवळची प्रतिस्पर्धी असलेली इथरियम या दोन्ही करन्सींचे बाजार भांडवल अनुक्रमे 400 अब्ज आणि 140 अब्ज एवढे घसरले आहे. त्यांच्या सर्वोत्तम मूल्याच्या 70 टक्‍क्‍यांनी खाली घसरलेले हे मूल्य आहे.

तज्ज्ञांच्या मते, क्रिप्टो करन्सीच्या किमतीतील घसरण महागाईच्या दबावामुळे होते. युक्रेन युद्ध, पुरवठा साखळीतील अडथळे, अन्नसुरक्षेचा प्रश्‍न, कोविडची जागतिक महामारी आणि तिच्याशी झालेला संघर्ष, गेल्या चार दशकांमधील अमेरिकेतील सर्वाधिक महागाई, वाढती बेरोजगारी यांसारख्या समस्यांशी बहुतांश देश झुंज देत आहेत. परिणामी सर्व बाजूंनी आलेल्या अडथळ्यांनी जागतिक आर्थिक वाढ खुंटत आहे. फेडरल रिझर्व्हने जारी केलेल्या चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी अमेरिकी वित्तीय बाजार प्रयत्न करीत आहे. त्यामुळे महागाईचा धोका वाढला आहे. त्याचा थेट परिणाम शेअर बाजार आणि क्रिप्टो करन्सीच्या मूल्यावर होत आहे.

काही संस्थांनी बिटकॉइन हे चलन या आशेने विकत घेतले, की ते शेअर बाजार आणि बॉंड्‌समधील घसरणीची भरपाई करेल; परंतु विश्‍वास तर दूरच; अलीकडील ट्रेन्ड असे सूचित करतात, की काही क्रिप्टो मालमत्ता व्यापक बाजाराच्या ट्रेंडशी अधिक संरेखित झाल्या आहेत. उदाहरणार्थ, आठ मे रोजी बिटकॉइन आणि इथरियम हे प्रसिद्ध क्रिप्टो चलन तसेच टेस्ला, ऍपल, मायक्रोसॉफ्ट आदी मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या किमतीतही घसरण झाली. साहजिकच जागतिक मंदीपासून क्रिप्टो चलन दूर राहील, हा विश्‍वास व्यर्थ ठरला आहे.

मे महिन्यात यूएसटी हे टोपणनाव असलेले टेरायूएसडी हे चलन कोसळल्याने क्रिप्टो मार्केटला धक्‍का बसला आहे. टेरायूएसडी हे विकेंद्रित अल्गोरिदमवर आधारित स्टेबलकॉइन आहे. मिन्ट आणि बर्न पद्धत वापरून एक यूएसटीचे मूल्य एक डॉलरवर कायम राखणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. यूएसटीचे मूल्य एक डॉलरवर राखण्यासाठी टेराचे मूळ चलन असलेल्या लुनाचा वापर केला जातो. बाजारातील अस्थिरता आणि एकूणच घसरणीमुळे स्टेबलकॉइन संतुलित ठेवण्यासाठीचे प्रयत्न व्यर्थ ठरले. या प्रक्रियेचे प्रतिबिंब म्हणजे जेव्हा यूएसटीची मागणी कमी होते, तेव्हा लुनावर विक्रीचा दबाव वाढतो.

मे महिन्यात जेव्हा दबाव वाढला तेव्हा दोन्हीची किंमत शून्याच्या जवळपास पोहोचली. घसरण होण्यापूर्वी टेरायूएसटीला सुरक्षित क्रिप्टो चलन मानले जात असे. त्यामुळे गुंतवणूकदारांना 19.5 टक्‍के नफा मिळत असे. 13 जून रोजी क्रिप्टो कर्ज देणाऱ्या सेल्सिअस या संस्थेने बाजारातील बिकट परिस्थितीचा हवाला देत ग्राहकांच्या क्रिप्टो मालमत्ता काढून घेण्यावर बंदी घातली आहे. तज्ज्ञांच्या मते, सेल्सिअस दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. सेल्सिअसने एकदा 2 दशलक्ष गुंतवणूकदारांकडून 20 अब्ज मालमत्तेचे व्यवस्थापन केले होते. क्रिप्टो गुंतवणुकीवर 18 टक्‍के परतावा दिला होता. विकेंद्रित वित्तव्यवस्थेवर आधारित जगातील सर्वांत मोठा निर्देशांक असलेल्या बिनान्ससह इतर अनेक संस्थांनीही अनेक व्यवहारांवर बंदी घातली आहे.

क्रिप्टो चलन उद्योगातील मंदीचा थेट परिणाम रोजगार कपातीच्या रूपात समोर आला आहे. कॉइनबेसने नियुक्‍तीवर बंदी घातली आहे. नोकरीच्या ऑफर्स रद्द केल्या आहेत. ब्लॉकफीने त्यांच्या 20 टक्‍के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. क्रिप्टो डॉट कॉम, जेमिनी यांसारख्या कंपन्यांही टाळेबंदीच्या तयारीत आहेत. एकूणच हजारो नोकऱ्या धोक्‍यात आल्या आहेत. क्रिप्टो मार्केटच्या अलीकडील घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे जागतिक आर्थिक परिस्थिती. ही घसरण क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांसाठी हानिकारक आहे. साहजिकच अनेक गुंतवणूकदार क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीची कायमस्वरूपी धास्ती घेतील.

परंतु ज्यांचे क्रिप्टोमधील गुंतवणुकीतील स्वारस्य अबाधित राहील, अशा गुंतवणूकदारांची संख्याही कमी नाही. क्रिप्टोकरन्सी हे स्थापनेपासूनच एक तात्पुरते, अस्थिर आणि धोकादायक आर्थिक साधन आहे. त्याला प्रवेशयोग्य आणि पारदर्शक बनविणे आवश्‍यक आहे. प्रमुख देशांची सरकारे योग्य नियम तयार करण्यासाठी क्रिप्टोकरन्सीच्या अस्थिरतेचा आणि मुख्य घटकांचा बारकाईने अभ्यास करत आहेत. सध्या क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीतून मोठा नफा कमावणारे बडे गुंतवणूकदारही गप्प आहेत. त्यांच्या मते, पडझडीत खरेदी करण्याची योग्य वेळ अद्याप आलेली नाही. त्यामुळे लहान गुंतवणूकदारांनी सध्या क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणे टाळावे आणि योग्य वेळेची वाट पाहावी.

Tags: editorialeditorial articleHeadline

शिफारस केलेल्या बातम्या

आता भारतभर मान्सूनचे आगमन
अग्रलेख

आता भारतभर मान्सूनचे आगमन

1 month ago
अबाऊट टर्न – “फ्लोअर’टेस्ट
अग्रलेख

अबाऊट टर्न – “फ्लोअर’टेस्ट

1 month ago
मीमांसा :  संरक्षण स्वावलंबनाचे वास्तव
संपादकीय

मीमांसा : संरक्षण स्वावलंबनाचे वास्तव

1 month ago
“शिंदे’पर्वाचा उदय
अग्रलेख

“शिंदे’पर्वाचा उदय

1 month ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

स्वातंत्र्यलढ्यात आदिवासींचे योगदान महत्त्वाचे – चित्रा वाघ

प्रशासकीय राजवट लांबणार?

निवडणुका सोबत लढणार की स्वबळावर?

पावसामुळे महिनाभरातच डांबरीकरण उखडले ! पुण्यातील कात्रज-दत्तनगर चौक रस्त्यावर खड्डेच खड्डे

माजी नगरसेवक गायकवाड यांच्याकडून पुण्यातील औंधमध्ये शालेय साहित्य वाटप

पुण्यातील हडपसरमध्ये स्कूलबसने घेतला पेट

पुणे महापालिकेने गोठ्यांसाठी दिलेल्या जागेचा बेकायदेशीरपणे व्यावसायिक वापर

“स्वच्छ पुणे-सुंदर पुणे’… अस्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे

राजस्थान रामदेवरा यात्रेसाठी पुण्यातून सायकलवारी

“हर घर तिरंगा’ अभियान “हर घर संविधान’शिवाय अपूर्ण ! डॉ. बाबा आढाव यांचे मत : मार्केट यार्डातील बाजार घटकांची बैठक

Most Popular Today

Tags: editorialeditorial articleHeadline

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!