अमृतसर : आपण कर्तारपूर साहीब गुरूद्वारात आपण सर्व पक्षीय जथ्यातून केवळ श्रध्दाभावनेने जात आहोत; असे सांगत कर्तारपूर कॅरीडोरच्या उद्घाटनाला आपण जाणार नसल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले.
मनमोहनसिंग यांनी कॅरिडोरच्या उद्घाटनाचे निमंत्रण स्वीकातल्याच्या बातम्या प्रस्दि झाल्या आहेत. मात्र, मनमोहनसिंग तसे काहीही करणार नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले, मी पाकिस्तानात कॅडिोरच्या उद्घाटनाला जाण्याचा प्रश्नच येत नाही. मला वाटतं मनमोहनसिंगसुध्दा जाणार नाहीत, असे ते म्हणाले. काही माध्यमांत मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानचे निमंत्रण स्वीकारल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे, या पार्श्वभूमीवर अमरिंदरसिंग यांनी हा तातडीने खुलासा केला.