नवी दिल्ली – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना सोमवारीपासून ताप जाणवत होता. त्यानंतर त्यांना बरं वाटू लागले होते. मात्र, आज त्यांना अशक्त वाटू लागल्याने अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्यावरील उपचारासाठी एम्सकडून एक टीम तयार करण्यात आली असून त्याचे प्रमुख हे डॉ. रणदीप गुलेरिया असणार आहेत.
यावर्षीच्या सुरूवातीला एप्रिलमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांना करोना विषाणूची लागण झाली होती. करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना 19 एप्रिल रोजी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर 29 एप्रिल रोजी त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. ते 88 वर्षांचे असून ते डायबेटीजसारख्या आजारानेही त्रस्त आहेत.
दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दोन बायपास शस्त्रक्रिया देखील झाल्या आहेत. त्यांची पहिली शस्त्रक्रिया 1990 मध्ये युनायटेड किंगडममध्ये करण्यात आली. तर 2009 मध्ये त्यांची दुसरी बायपास शस्त्रक्रिया एम्समध्ये करण्यात आली होती.