नवी दिल्ली – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह 54 राज्यसभा खासदार बुधवारी राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. या सर्वच खासदारांचा कार्यकाळ काल संपला. तसेच नऊ केंद्रीय मंत्रीही राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. एकीकडे मनमोहन सिंग राज्यसभेतून निवृत्त झाले असतानाच दुसरीकडे काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी या राज्यसभा सदस्य म्हणून प्रथमच सभागृहात प्रवेश करतील.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ऑक्टोबर 1991 मध्ये ते प्रथमच वरच्या सभागृहाचे सदस्य झाले. ते 1991-1996 पर्यंत नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री आणि 2004 ते 2014 पर्यंत पंतप्रधान होते.
तसेच या सात केंद्रीय मंत्र्यांमध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री पुरषोत्तम रुपाला, माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचा समावेश आहे. माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री एल. मुरुगन यांचा कार्यकाळ मंगळवारी संपला. भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांचा कार्यकाळ बुधवारी संपला. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा कार्यकाळ देखील काल संपला आहे.
शरद पवार यांची पोस्ट
मनमोहन सिंग राज्यसभेतून निवृत्त झाल्यानंतर शरद पवार यांनी देखील एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. “उदयोन्मुख भारताचा विकासाभिमुख चेहरा म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंह! डाॅ. सिंह आज ३३ वर्षांनी राज्यसभेतून सेवानिवृत्त होत आहेत. डाॅ. मनमोहन सिंह यांच्यासोबत त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रीमंडळात केलेले कामकाज आठवते.”
उदयोन्मुख भारताचा विकासाभिमुख चेहरा म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंह! डाॅ. सिंह आज ३३ वर्षांनी राज्यसभेतून सेवानिवृत्त होत आहेत. डाॅ. मनमोहन सिंह यांच्यासोबत त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रीमंडळात केलेले कामकाज आठवते. जागतिक स्थित्यंतरे लक्षात घेऊन ऐन आर्थिक… pic.twitter.com/PZ6BTRB7k0
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 3, 2024
पुढे त्यांनी लिहिले की, “जागतिक स्थित्यंतरे लक्षात घेऊन ऐन आर्थिक संकटाच्या काळात भारताला अर्थकारणात सशक्त करण्यात डाॅ. मनमोहन सिंह यांचे अभूतपूर्व योगदान आहे. डाॅ. मनमोहन सिंह यांचा संसदीय कार्यकाळ भारताच्या इतिहासात सुर्वणाक्षरांनी लिहिला जाईल! डाॅ. मनमोहन सिंह यांना मनपूर्वक शुभेच्छा!”
केंद्रीय मंत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात Manmohan Singh Retired From Rajya Sabha|
अश्विनी वैष्णव वगळता हे सर्व केंद्रीय मंत्री लोकसभा निवडणूक लढवत आहेत. वैष्णव आणि मुरुगन यांना आणखी एक राज्यसभेची मुदत देण्यात आली आहे. जया बच्चन आणि मनोज कुमार झा यांना पुन्हा नॉमिनेट केले आहे. तर समाजवादी पक्षाच्या जया बच्चन, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज कुमार झा आणि काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांचाही वरिष्ठ सभागृहातून निवृत्त झालेल्यांमध्ये समावेश आहे.
यापैकी जया बच्चन आणि मनोज कुमार झा यांना त्यांच्या पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र, अभिषेक मनु सिंघवी हिमाचल प्रदेशमधून निवडणूक हरले आहेत.
हेही वाचा :
स्वत:चे घर नाही, म्युच्युअल फंडात कोट्यावधींची गुंतवणूक; राहुल गांधी यांची एकुण संपत्ती किती?